आ.दीपक केसरकर यांनी केले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक
मुंबई प्रतिनिधी: नवे मुख्यमंत्री कोण हा वाद आता मिटला असून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण केंद्र जो निर्णय घेईल ते मान्य करु असे म्हटले आहे. यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. एक सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार मागे टाकले परंतू एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचाराला मान्यता दिली. त्यांना महायुतीसोबत पुढे आणखी जोमाने काम करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बाळासाहेबांची खरी शिवसेना एकनाथ शिंदेकडे यांच्याकडे असून ते तिला आणखी ताकदवान करतील असेही केसरकर म्हणाले.













