जिल्ह्यात १७ पंचायत समिती सदस्य केले बिनविरोध
शिंदे सेनेचा जिल्हा परिषद मध्ये १ तर दोडामार्ग पंचायत समिती मध्ये १ सदस्य बिनविरोध
कणकवली : 50 सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ सदस्य तर शिवसेनेचा ( शिंदे) एक असे जिल्हा परिषदेत एकूण ८ उमदेवार बिनविरोध झाले आहेत. तर शंभर पंचायत समिती सदस्यांमधून भारतीय जनता पार्टीचे १६ सदस्य बिनविरोध झाले आहेत आणि शिंदे शिवसेनेचा एक सदस्य बिनविरोध असे एकूण १७ सदस्य बिनविरोध झालेला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नियोजनबद्ध निवडणूक रणनीतीमुळे सर्वाधिक जागा बिनविरोध होण्याचा विक्रम नोंदविला गेला आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग( बिनविरोध )
१) खारेपाटण; प्राची इस्वालकर(भाजप)
२)बांदा; प्रमोद कामत (भाजप)
३)जाणवली; रुहिता राजेश तांबे ( भाजची कार्यकर्ती उमेदवार शिवसेना)
४)पडेल ;सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
५)बापर्डे ;अवनी अमोल तेली (भाजप)
६) पोंगुर्ले; अनुराधा महेश नारकर (भाजप)
७)किंजवडे-सावी गंगाराम लोके (भाजप)
८) कोळपे; प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)
पंचायत समिती कणकवली( ६ बिनविरोध)
१)वरवडे ; सोनू सावंत (भाजपा)
२)नांदगाव; हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)
३) जाणवली महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)
४) बिडवाडी; संजना संतोष राणे (भाजप)
५) हरकुळ बुद्रुक; दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप)
६) नाटळ ; सायली संजय कृपाळ (भाजप)
देवगड तालुक्यातील पंचायत समिती(६ बिनविरोध)
१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
२)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
३)बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)
४) फणसगाव – समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)
५) शिरगाव – शितल सुरेश तावडे (भाजप)
६) कोटकामते -ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप)
पंचायत समिती वैभववाडी( बिनविरोध)
कोकिसरे; सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप)
पंचायत समिती वेंगुर्ले (बिनविरोध)
आसोली; संकेत धुरी (भाजप)
मालवण पंचायत समिती ( बिनविरोध)
अडवली मालडी; सीमा सतीश परुळेकर (भाजप)
सावंतवाडी पंचायत समिती (बिनविरोध)
शेरले; महेश धुरी (भाजप)
दोडामार्ग पंचायत समिती (बिनविरोध)
कोलझर; गणेश प्रसाद गवस (शिंदे सेना)


Subscribe









