जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक कुडाळ येथे संपन्न

कुडाळ : होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ येथे शिवसेना प्रमुख पदाधिकारी यांची कुडाळ मालवणचे चे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या आदेशानुसार बैठक पार पडली.

या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत झाराप गावचे उपसरपंच मंगेश भास्कर गावकर यांची शिवसेना मागासवर्गीय उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी दीपलक्ष्मी पडते शिवसेना महिला जिल्हाप्रमुख, संजय पडते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, दादा साईल शिवसेना जिल्हा सरचिटणीस, व्ही.जे.एन.टी. महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर, अरविंद करलकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख, रत्नाकर जोशी शिवसेना जिल्हाप्रवक्ते, विनायक राणे शिवसेना तालुकाप्रमुख, स्वरूप वाळके युवा सेना उपजिखाप्रमुख, विजय जाधव शिवसेना मागासवर्गीय, तालुकाप्रमुख, रचना नेरुरकर महिला तालुकाप्रमुख, नागेश आईर वेताळ बांबर्डे विभाग प्रमुख, अनिकेत तेंडोलकर युवा सेना तालुकाप्रमुख आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!