कुडाळ : जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेताळ बांबर्डे नं १ चे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक २ जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाले. या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या अप्रतिम सादरीकरणाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी भूषवले. या कार्यक्रमाला भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, उद्योजक एस. पी. सामंत, उद्योजक जितेंद्र सावंत प्रमुख अतिथी म्हणून लाभले.
यावेळी वेताळ बांबर्डे उपसरपंच शैलेश घाटकर, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, माजी उपसरपंच तथा सदस्य प्रदीप गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सखाराम सावंत, उपाध्यक्ष सदिच्छा सरमळकर, मुख्याध्यापक समीक्षा परब, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षीपासून आदर्श विद्यार्थी व आदर्श पालक यांची निवड करण्यात येणार असून ही संकल्पना विनायक ठाकूर यांनी मांडली. यावर्षीचा आदर्श पालक पुरस्कार विठ्ठल सावंत यांना मिळाला.