वेताळ बांबर्डे (कदमवाडी) येथील युवक बेपत्ता

कुडाळ : शेतात जाण्यासाठी निघालेला वेताळबांबर्डे येथील कदमवाडी परिसरातील तरुण बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आबाजी वासुदेव कदम (वय २३, रा. वेताळबांबर्डे, कदमवाडी ता. कुडाळ) हा १५ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घरातून निघाल्यानंतर अद्याप सापडलेला नाही.

याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात वडील वासुदेव आबाजी कदम (वय ६०) यांनी नापत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता आबाजी हा आईने दिलेली पेजेची कितली घेऊन शेतात काम करत असलेल्या वडिलांकडे जाण्यासाठी घरातून निघाला होता. मात्र तो शेतात पोहोचला नाही. त्यामुळे सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास वडील घरी आले असता, आबाजी घरातून निघून गेल्याची माहिती पत्नीने दिली.

त्यानंतर वडील व नातेवाईकांनी गावात तसेच आसपासच्या परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र आबाजीचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. अखेर मंगळवारी कुडाळ पोलीस ठाण्यात नापत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!