शिवसेना ओबीसी व्ही. जे. एन. टी. जिल्हाप्रमुखपदी संजय भोगटे

कुडाळ : शिवसेनेच्या ओबीसी व्ही. जे. एन. टी. जिल्हाप्रमुखपदी संजय भोगटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे प्रशासन हाताळण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढणार आहे.

error: Content is protected !!