भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी खास दौरा.

सिंधूनगरी प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मविआचा दणाणून पराभव केल्यामुळे तसेच महायुतीचे वर्चस्व कायम ठेवून मिळालेले यश लक्षात घेता सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती आज येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.प्रभाकर सावंत यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपा. महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन अभिनंदन केले.

error: Content is protected !!