मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकी नंतर राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली होताना दिसत असून सद्ध्या वारे आहे ते नव्या मंत्री मंडळाचे.त्यातच महायुतीने मविआ चा सुपडा साफ केल्यामुळे आता बहुतेक आमदार शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी चर्चा होता आहे.त्यातच मंत्री उदय सामंत यांनी उबाठाचे काही आमदार शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे.त्यामुळे मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठक असून यात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत.
या बैठकीत शिवसेना उबाठा पक्षाच्या गटनेते, प्रतोद संदर्भात निर्णय अपेक्षित आहेत. राज्यात भाजप महायुतील तब्बल 236 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर, शिवसेना शिंदे गटानेही तब्बल 57 जागांवर विजय मिळवला असून गत कार्यकाळात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते, त्यापेक्षा जास्त आमदार आता विजयी झाले आहेत. तर, शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आले आहेत.
दरम्यान महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्याचं दिसून येत आहे. मात्र, सत्तास्थापनेपूर्वीच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली असून आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतले जाणार असल्याची माहिती आहे. गतवेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत ठाकरेंकडून ही खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून येते,













