आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी

तर सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना ठाकरे गटाचे निर्णय होतील

भास्कर जाधव यांची गटनेते पदी निवड

उबाठा बैठकीत महत्वाचे निर्णय

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत उबाठाला फक्त २० जागांवर समाधान मानावे लागले असून आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ आणि पुढे होऊ घातलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक या सर्व गोष्टींचा विचार करता प्रत्येक पक्षांच्या बैठका होताना दिसत आहेत. नुकतंच शिवसेना ठाकरे गटाची एक बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे नवनियुक्त आमदार उपस्थितीत होते. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठाकरे गटाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली.

आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम

यात आदित्य ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्यात आली.आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम राहणारमहाविकासाआघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकीच्या निकालानंतर एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाच्या विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या प्रतोदपती नियुक्ती करण्यात आली आहे.

यामुळे आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा शब्द अंतिम असणार आहे. तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. यासह प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना ठाकरे गटाचे निर्णय होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *