काल शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तातडीने आज लगेच जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दत्ता सामंत यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती केली असून दत्ता सामंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ताकदवान नेतृत्व मानले जाते. दत्ता सामंत यांनी काल खासदार नारायण राणे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती. माजी खासदार व कुडाळ मालवण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा शब्द देत असताना त्यांच्या सोबतच दत्ता सामंत हे शिवसेना पक्षामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर आता दत्ता सामंत यांना तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जिल्हाप्रमुख पद देऊन त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला आहे. दत्ता सामंत यांच्याकडे कुडाळ मालवण व कणकवली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.