शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी संजय आंग्रे यांची निवड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र

शिवसेना पक्षाच्या उपनेते पदावर सिंधुदुर्ग शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी याबाबतची नियुक्ती केली असून पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती पत्र संजय आंग्रे यांना दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रवींद्र फाटक नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते दत्ता सामंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!