भाजप नेते पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातूनच सडूरे शिराळे गावचा विकास

उपसरपंच नवलराज काळे यांचे प्रतिपादन

प्रभाग सदस्या विशाखा नवलराज काळे यांनी मानले पालकमंत्री नितेश राणे साहेब व शक्ति केंद्रप्रमुख प्रकाश पाटील यांचे आभार

वैभववाडी– पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीने डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या सडूरे चव्हाणवाडी अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी बाल कल्याण प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे यांच्या शुभहस्ते व सरपंच दीपक चव्हाण उपसरपंच नवलराज काळे प्रभाग सदस्य विशाखा नवलराज काळे मुख्य सेविका सकपाळ मॅडम, प्राथमिक शिक्षक संदीप शेळके सर,यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.यावेळी अंगणवाडी सेविका भावना सावंत, जागृती रावराणे,श्रीमती करपे,मदतनीस प्रमिला जंगम, संजय गायकवाड,केशव राऊत, कल्पना चव्हाण,नारायण भोसले, रघुनाथ भोसले, भास्कर सावंत, अंजली चव्हाण,चंद्रकांत जंगम, दिपक राणे,सुनील राऊत,दीपक कदम व इतर ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी बोलत असताना उपसरपंच श्री नवलराज काळे यांनी पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून सडूरे शिराळे गावाला भरघोस निधी उपलब्ध झाला जे प्रलंबित कामे होती ती 2017 पासून या गावात नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून होत आहेत. 2009 ला अस्तित्वात आलेले अंगणवाडी सुसज्ज अशा इमारतीची प्रतीक्षा करत होती मधील काळात अनेक अडचणी होत्या जागा उपलब्ध होती परंतु जागेपर्यंत साहित्य आणण्याकरता रस्ता उपलब्ध नव्हता तो रस्ता 2018 पासून जनतेच्या एकतेतून शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील यांच्या सहकार्यातून नितेश राणे साहेब यांच्या फंडातून पूर्ण करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही केला. मागील कार्यकारिणीने आणि आत्ताच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच सहकार्य केलं. प्रभाग सदस्या विशाखा काळे यांनी जनतेच्या भावनेचा विचार करून केलेल्या मागणीचा सरपंच व माजी उपसरपंच आनंद जंगम व कार्यकारणी सदस्य यांनी सकारात्मक विचार करून सदर मागणीला पाठिंबा दर्शवला. शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील यांच्या सहकार्यातून पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून डोंगरी विकास मधून इमारतीला निधी मंजूर झाला व ते काम पूर्ण होऊन आज या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले की अभिमानाची गोष्ट आहे. हे सर्व जे काही घडतं ते सर्वांच्या एकटेतून एकजुटीमुळे घडत असतं त्यामुळे ही एकजुटता आपण कायम ठेवली पाहिजे.. सत्ता नसताना देखील आमदार नितेश राणे साहेब यांनी आम्हावर ती कोणताही अन्याय होऊ दिला नाही आता तर ते सत्तेत आहेत येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून भरघोस निधी गावाला आणून देण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व कटिबद्ध राहू. आज पर्यंत या गावांमध्ये नितेश राणे साहेब यांनीच विकास केला आहे.त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी नेहमीच राहील पाहिजे. असे प्रतिपादन श्री नवलराज काळे यांनी केले. यावेळी सौ काकडे मॅडम, सौ सपकाळ मॅडम अंगणवाडी सेविका भावना सावंत यांनी उपस्थितांना संबोधित केले.प्राथमिक शिक्षक संदीप शेळके यांनी केले प्रभाग सदस्य सौ विशाखा नवलराज काळे यांनी प्रभागातील विकास कामांना पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्याकडून भरघोस निधी मिळाल्याबद्दल व जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल राणे साहेब यांचे आभार व्यक्त केले तसेच पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्याकरिता शक्ति केंद्रप्रमुख प्रकाश पाटील यांचे आभार व्यक्त करत गावातील जनतेचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!