उबाठा गटाचे सुकळवाड उपविभाग प्रमुख निलेश पुजारे, शाखाप्रमुख दिपक पुजारे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश
जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी केले स्वागत
संतोष हिवाळेकर /पोईप
सुकळवाड जिल्हा परिषद मतदार संघातील हेदुळ येथील उबाठा गटाचे सुकळवाड उपविभाग प्रमुख निलेश पुजारे, शाखाप्रमुख दिपक पुजारे उपशाखाप्रमुक भिकाजी पुजारे,माजी उपसरपंच दर्शना पुजारे, ग्रामपंचायत सदस्य आदिती शेमडकर,शैला हेदुळकर, तसेच रुपसेन पुजारे, अरविंद मोर्ये,प्राची मोर्ये, दीशा पुजारे, हरिश्चंद्र परब, तारामती परब, स्वयंभू परब, सदानंद मोर्ये, नारायण पुजारे, लक्ष्मण शेबडकर,मंगेश लोहार,सुरेश कोळमकर, महादेव कोळमकर, सचिन शेमडकर, प्रशांत शेबडकर,शिलावती शेबडकर, घनश्याम शेमडकर सुधाकर भाताडये, निलेश मसुरकर, मधुकर पुजारे, यांच्या सह अन्य बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला
यावेळी उपविभागप्रमुख निलेश पुजारे यांनी सांगितले की आम्ही सर्व शिंदे सेनेत प्रवेश कर्तये मा आमदार निलेश राणे यांच्या प्रत्येक गावात जो विकास कामाचा धडाका लावला आहे त्या विकास कामावर प्ररीत होत व आमचे जिल्हाध्यक्ष मा दत्ताजी सामंत साहेब यांच्यावर विषवास ठेवत हा प्रवेश करत आहोत तसेच या गावातील आम्ही शिवसैनिक प्रवेश करायच्या आधी आम्हची राहिलेली विकास कामे मार्गी लावली आहेत
गेल्या 10 वर्षात जो विकास झाला नाही ती राहिलेली विकास कामे येत्या दोन ते तीन महिन्यांत मार्गी लावण्याचा शब्द यावेळी दिला मा.श्री दत्ताजी सामंत यांनी प्रवेशकर्त्याना दिला. यावेळी उपस्थित माजी पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर, उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण, संपर्क प्रमुख मालवण पंकज वर्दम,कसाल सरपंच राजन परब, युवासेना तालुका प्रमुख स्वप्निल गावडे, माजी सरपंच प्रकाश पावसकर, माजी सरपंच जयवंत परब, युवासेना विभागप्रमुख कनैया गावडे हे उपस्थित होते.


Subscribe










