युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांची कार्यतत्परता

कुडाळ : युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांची कार्यतत्परता पुन्हा एकदा बघायला मिळाली. मूळदे येथील महिला अचानक मध्यरात्री प्रसूती कळा यायला लागल्या भर रस्त्यातच वाहनांची सोय होईना. कोणती तरी गाडी मिळेल म्हणून सदर महिला व कुटुंबीय चालत उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे येथे चालत आहे पण तोवर त्या महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्या. कोणत्याही वाहनांची उपलब्धता होईना व 108 शी संपर्क होईना. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच स्थानिकांनी तात्काळ युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांच्याशी संपर्क केला. त्यांनी मध्यरात्री तात्काळ दखल घेत आरोग्य यंत्रणेशी संपर्क करत त्वरित रुग्णवाहिका पाठीवली. पण प्रसूती वेळ नजीक आल्याने महिलेला तिथून हलवणे धोकादायक होऊ शकते हे लक्षात घेऊन त्या महिलेची सुखरूप प्रसूती रुग्णवाहिकेत करण्यात डॉ सुविधा गावडे आशा सेविका संतोषी चव्हाण व रुग्णवाहिका ड्रायव्हर गणेश तावडे यांना यश आले. या सर्वांच्या कार्यतत्परतेमुळे समाधान व्यक्त होत असून स्वरूप वाळके यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!