शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे आक्रमक व्यवस्थापक यांना सुनावले खडे बोल.
महिला व पालकांची लक्षनीय उपस्थिती.
तालुक्यातील नेरुर येथून दर दिवशी सुटणारी एसटी बस गेली सात ते आठ महिन्यापासून वेळेत जात नाहीये त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्याचा विनाकारण त्रास भोगाव लागतो साधारण 70 ते 80 विद्यार्थी हे नेरूळ मार्ग ते कुडाळ शहर सह डॉन बॉस्को येथील शाळेत शिकत आहे.हे बाब मा जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या निदर्शनास स्थानिक पालकांनी आणून दिली. त्यांनी तात्काळ शिवसेना पदाधिकाऱ्यांचे पालकांना घेऊन कुडाळ आगार व्यवस्थापकांना भेट घेऊन चांगलेच धारेवरती धरल.
आगार व्यवस्थापक यांना वारंवार पालकांनी निवेदन देऊन देखील समस्यांचे निवारण झालं नाही. वेळे प्रसंगी मला 353 गुन्हा अंगावर घ्यावा लागेल. मला हलक्यात घेऊ नका असे खडे बोल कुडाळ आगार व्यवस्थापक यांना शिवसेनेचे शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी सुनावले.
आगार व्यवस्थापक यांनी देखील तात्काळ अधिकाऱ्यांना बोलून उद्यापासून एसटीची सेवा वेळेत द्या अशा सूचना तात्काळ केल्या. त्यावेळी पालकांची व महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.त्यावेळी उपस्थित कुडाळ शिवसेना शहराध्यक्ष व नगरसेवक अभिषेक गावडे, तालुका संघटक राकेश कांदे, माजी नगरसेविका आश्विनी ताई गावडे, सोशल मीडिया राजवीर पाटील, संदेश सावंत तसेच उन्नती राणे,सरोज बांबर्डेकर, मिलन राऊळ, बिना फर्नांडिस, अनिता फर्नांडिस माधवी रामदास, श्रुती करलकर, आदिती घाडीगावकर, अभय वालावालकर, मारिया डिसोजा, पूजा कलिंगन, मेगा परब,महाडगूत, निखिल नागवेकर, उमेश तेंडोलकर, सहदेव मल्हार, बेलस्विन फर्नांडिस आदी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Subscribe










