कारण गुलदस्त्यात
कुणाचातरी फोन आल्यानंतर तणावाखाली गेली असल्याची चर्चा
दोडामार्ग : तालुक्यातील मांगेली फणसवाडी येथे कु. समीक्षा सुनिल गवस (१८) हिने सोमवारी सायंकाळी घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
समीक्षा ही भेडशी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये बारावीची विद्यार्थिनी होती. सोमवारी कॉलेजवरून घरी परतल्यानंतर तिला कुणाचातरी फोन आला होता, त्यानंतर ती तणावाखाली गेल्याची चर्चा आहे.
घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काका उमेश रामा गवस यांनी पोलिसांना खबर दिली असून पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मोबाईल कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी होत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Subscribe










