सौ रश्मी नाईक यांचेकडून सर्वांना मोफत कॅम्पचे आयोजन
चेंदवण, कवठी, वालावल, चिपी भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे एकदिवसीय आधारकार्ड अपडेशन कॅम्प सौ रश्मी नाईक यांचेकडून मोफत आयोजित केला याला चेंदवण ,कवठी ,वालावल, चिपी आदी भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सौ रश्मी नाईक, विभागीय समन्वयक श्री कल्पेश पोयरेकर, शाखा प्रमुख श्री तुषार नाईक, गटप्रमुख श्री स्वप्नील चेंदवणकर, चेंदवण हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री माणिक पवार, श्री अण्णा भरडकर,कवठी पोलिसपाटील श्री विठ्ठल राणे, पोलिसपाटील सौ शुभश्री शृंगारे , आदी उपस्थित होते.
एकदिवसीय शिबीरात मुलांपासून जेष्ठांपर्यंत आधारकार्ड मधील नोंदी अदययावत करण्यात आल्या. यासाठी कोणाकडूनही शूल्क आकारण्यात आले नाही.हे शिबीर चेंदवण च्या सामाजिक कार्यकर्त्या सौ रश्मी नाईक यांचेकडून सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आले होते.उपस्थित लोकांनी सौ रश्मी नाईक यांचे आभार व्यक्त केले.

Subscribe










