दोन भावांची भांडणे सोडवायला गेलेल्या बहिणीच्या डोक्यात मारली लाकडी रीप

युवती गंभीर जखमी

सावंतवाडी येथील घटना

सावंतवाडी : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात सांगली इस्लामपूर येथील पर्यटकांनी एकमेकांना मारहाण केली. विशेष म्हणजे हे दोघे एकमेकांचे भाऊ आहेत. दरम्यान ही मारामारी सोडवण्यासाठी गेलेल्या बहिणीच्या डोक्यात एकाने लाकडी रीप मारल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. ही घटना आज गरड- बांदा नाका येथे पेट्रोल पंप परिसरात घडली. त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कौटुंबिक विषय असल्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे याबाबत उशिरापर्यंत पोलिसांना कोणती नोंद करण्यात आली नव्हती. याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली इस्लामपूर येथील एक कौटुंबिक ग्रुप गोवा येथे फिरण्यासाठी आला होता. तिथून परत जात असताना गरड परिसरातील माजगाव नाला येथे त्यांच्यात वाद झाले. यावेळी दोन भावांचा वाद झाला. दोघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना सोडण्यासाठी गेलेल्या बहिणीवर लाकडाची रीप बसली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर हा प्रकार पाहून त्याठिकाणी मोठी गर्दी जमली. जमलेल्या काही नागरिकांनी त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलीस आले परंतु हा कौटुंबिक विषय असल्यामुळे त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे याबाबत पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत कोणतीही नोंद नाही असे सांगण्यात आले.

error: Content is protected !!