चेंदवण ग्रामपंचायतीत आधार कॅम्प यशस्वी

चेंदवण ग्रामपंचायतच्या माध्यमातून आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमधे ४० जणांचे आधार अपडेट करण्यात आले. सरपंच मा.वैभवजी चेंदणकर यांनी श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण हायस्कूलच्या २९ विद्यार्थी यांचा आधार अपडेटचा संपूर्ण खर्च उचलला. तसेच भूपेश चेंदणकर यांचे विशेष सहकार्य लाभले .

या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य,सर्व कर्मचारी वर्ग व मान्यवरांचे सहकार्य लाभले.

विद्यार्थी, पालक,शाळा व चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई च्या वतीने ग्रामपंचायत चेंदवण, सरपंच वैभवजी चेंदणकर, भूपेश चेंदणकर तसेच संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.या वेळी मुख्याध्यापक श्री.पवार सर, शिक्षक वर्ग, ग्रा.प.सदस्य श्री.नारायण शृंगारे,श्री.गैतम चेंदवणकर,सौ.सुचिता पोयरेकर, ग्रा.से.श्री.साळगावकर,तलाठी श्री.नेरकर,श्री.बाळु कोचरेकर, अंगणवाडी सेविका,ग्रामस्थ, हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठी तं.मु.स.अध्यक्ष श्री.भुपेश चेंदवणकर, ग्रा.प. कर्मचारी श्री.रांगणेकर, सौ.धुमाळ, सौ.स्वाती परब,श्री.अविनाश शृंगारे यांनी विशेष मेहनत घेतली.

error: Content is protected !!