जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवजे नं 1 व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरवाडी येथे शिवसेना माजी शाखाप्रमुख मा विजयजी घरत यांचे वतीने विध्यार्थीयांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी वेताळ बांबर्ड विभाग प्रमुख नागेश आईर मागास सेल तालुका प्रमुख विजय जाधव शाखा प्रमुख सीताराम चव्हाण ग्रामपंचायत सदस्य भाई कदम शाळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक सावंत मुख्याध्यापक शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवजे नं 1 शाळेच्या मागणीवरून शाळेला संगणक देण्याचे श्री घरत यांनी जाहीर केले.

Subscribe










