बांधकाम कामगार यांना मिळणार गृहोपयोगी संच भेट

गणेश चतुर्थी मध्ये कामगार यांना मिळणार गृहपयोगी संच भेट. लाडक्या सरकारचे खूप खूप आभार

कामगार वर्गाकडून समाधान व्यक्त – श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून मिळणार गृहोपयोगी संच

      बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत जिवीत ( सक्रीय) बांधकाम कामगारांना वितरीत करावयाच्या गृहपयोगी वस्तू संचाबाबत सुधारित कार्यपध्दतीबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

(अ) बांधकाम कामगाराने दयावयाचे स्वयं घोषणापत्र संगणक प्रणालीमध्येच तयार होणार असल्याने बांधकाम कामगाराने ते स्वतंत्रपणे भरून देण्याची आवश्यकता असणार नाही.

(ब) बांधकाम कामगाराने ऑनलाईन पध्दतीने निश्चित भेट दिनांक (Appointment) करीता अर्ज सादर करताना मंडळाच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. सदर अर्ज करताना मोबाईल क्रमांकावर OTP (One Time Password) येईल. त्यानंतर सदर OTP द्वारे आपणास हवी असलेली दिनांक व वितरण केंद्र निवड करता येईल.

(क) प्रत्येक वितरण केंद्राची प्रतिदिन वितरण क्षमता २५० ऐवजी ५०० इतकी ठेवण्यात आली आहे.

(ड) सर्व वितरण केंद्राकरीता दिनांक ३१.१०.२०२५ पर्यंतचे दिनांक (शासकीय सुट्टया वगळून) खुले ठेवण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल.

(इ) संकेतस्थळावरील बांधकाम कामगाराचा फोटो व बांधकाम कामगाराने सादर कलेले मंडळाचे ओळखपत्र/आधारकार्डवरील फोटो एकसमान नसल्यास गृहपयोगी वस्तू संच वितरीत करण्यात येणार नाही. तसेच स्वतंत्र घोषणापत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.

उपरोक्त प्रमाणे प्राप्त होणाऱ्या अर्जानुसार बांधकाम कामगाराचे बोटांचे ठसे (Biometric) व छायाचित्र (Online Photo) घेऊन त्यांना गृहपयोगी वस्तू संच ताब्यात देण्यात येणार आहेत.

🛑 श्रमिक कामगार संघटन्येच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत की सदर गृहोपयोगी संच हा पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. कोणत्याही एजंट यांना गृहपयोगी संच साठी पैसे देण्यात येऊ नये तसेच कोण पैसे घेत असल्यास संघटनेशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी संपर्क
अध्यक्ष – श्री. प्राजक्त चव्हाण
9028390839

error: Content is protected !!