संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंतीनिमित्त दशक्रोशीतील कलावंतांचा सन्मान

निरुखे ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम

कुडाळ : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त ग्रामपंचायत निरुखेमार्फत मर्मबंधातली ठेव – सोहळा माऊलीचा सन्मान कलावंताचा या कार्यक्रमांतर्गत दशक्रोशीतील भजनी कलाकार, दशावतार, कलाकार, कीर्तनकार ढोल वादक या सर्व कलावंतांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी भजनी बुवा माननीय श्री भालचंद्र केळुसकर, कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री प्रफुल्ल वालावलकर, कुडाळ नगरसेविकास सौ. संध्या तेरसे, कुडाळ तालुका सर्वपक्षीय सरपंच संघटना अध्यक्ष श्री राजन परब, बुवा महेश सावंत, ज्ञानदेव मेस्त्री, बुवा श्री गुंडू सावंत, सरपंच-उपसरपंच निरुखे, ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी यशस्वी सुधीर सावंत यांनी केले. तसेच रिद्धी तेरसे व अनुराग ठाकूर यांनी अभंग गायन केले. भाग्येश तेरसे, कुमार रविराज तरसे यांनी पखवाज वादन केले. कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या आरतीने व महाराष्ट्र गीत गाऊन करण्यात आली.

error: Content is protected !!