कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतले आरवलीच्या वेतोबाचे सपत्नीक दर्शन

वेंगुर्ला : कोकण आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी आरवलीच्या श्री देव वेतोबाचे सपत्नीक दर्शन घेतले यावेळी त्यांचा श्री देव वेतोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष जयवंत राय यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.

आरवलीच्या श्री देव वेतोबाची सर्वदूर पसरलेली खाती, नवस पूर्ण झाल्यानंतर देवाला अर्पण केला जाणारा पादुकांचा जोड याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. देवस्थानचा परिसर भक्तीमय वातावरण व सुसूत्र व्यवस्थापन याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष जयवंत राय, सचिन दळवी, तहसीलदार, पोलीस पाटील, मंडल अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!