रांगणातुळसुली भावई मंदिर येथे संगीतरत्न भजन सम्राट श्री.भालचंद्र केळुसकर बुवा संचलित नमो शारदा संगीत क्लासेस आयोजित गुरुवंदना सोहळा २०२५

उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ

उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांच्या शुभ हस्ते रांगणातुळसुली भावई मंदिर येथे संगीतरत्न भजन सम्राट श्री.भालचंद्र केळुसकर बुवा संचलित नमो शारदा संगीत क्लासेस आयोजित गुरुवंदना सोहळा २०२५ संचालक बुवा श्री.रामचंद्र परब या कार्यक्रमाचा शुभारंभ उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते झाला या कार्यक्रमांचे प्रथम गणेश प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तद्नंतर श्रीफळ वाढविण्यात आले.या कार्यक्रमात बोलताना उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना भजन ही संताची परंपरा आहे.आम्ही जेव्हा राऊळ महाराज यांच्या मठात जेव्हा असतो तेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम संपन्न होतात.त्याचप्रमाणे संचालक बुवा श्री.रामचंद्र परब यांनी गुरु शिष्य परंपरा ही जोपासत आहेत असे गौरवोद्गार उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांनी काढले.या कार्यक्रमास उपस्थित संचालक बुवा श्री.रामचंद्र परब, रांगणातुळसुली गावचे प्रमुख मानकरी श्री.प्रकाश आईर,भगीरथ प्रतिष्ठान विभागीय अध्यक्ष श्री.संजय सावंत,बुवा श्री.केशव मोहिते,माजी मुख्य व्यवस्थापक SBI सौ.ललिता नानल मॅडम,माजी सरपंच डिगस श्री.रमेश घोगळे, ऍडव्होकेट सौ.सामंत, बुवा श्री. लवू कोळेकर, आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी उद्योजक श्री.रुपेश पावसकर तसेच इतर मान्यवर या यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!