परप्रांतीय कामगाराने फावडे घातले डोक्यात
स्थानिक तरुण गंभीर
कुडाळ : शुल्लक कारणावरून परप्रांतीय युवकांनी स्थानिक तरुणांना मारहाण केल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे रात्री ८ च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक दोन तरुण आणि तीन परप्रांतीय तरुणांमध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. यानंतर तीन परप्रांतीय युवकांनी दोघा स्थानिक युवकांना आपल्या खोलीत नेऊन मारहाण केली. यातील एका युवकावर फावडे मारून गंभीर जखमी केले. याची तत्काळ माहिती मिळताच स्थानिक युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक युवकांची सोडवणुक करून पोलिसांना खबर दिली.

Subscribe










