शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी रोहित भोगटे यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ तालुका संघटकपदी रोहित भोगटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते आज त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यापूर्वी देखील कुडाळ शहरप्रमुख म्हणून आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. त्यांच्यातील संघटन कौशल्य ओळखून त्यांच्यावर तालुका संघटकपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यांच्याशी फार मोठा युवावर्ग जोडला गेला असून संघटना वाढीसाठी त्याचा फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!