कर्ली नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात होणारे अवैध्य वाळू उत्खनन व वाहतूक यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्डेमय दुरावस्था यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १५ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला होता. मनसेच्या निवेदना नंतर तहसीलदार कुडाळ यांनी कवठी,चेंदवण व वालावल याठिकाणी अवैध्य वाळू उत्खननावर कारवाई करत त्याठिकाचे ऱ्यांम जेसीबीच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आल्याचे तसेच आत्ता पर्यंत ५ डंपर वर शासनाच्या नवीन कायद्याप्रमाणे फौजदारी कारवाई देखील केली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी तहसीलदार यांच्यामार्फत झालेल्या कारवाईच्या ठिकाणी पुन्हा अनधिकृत वाळू उपसा सुरू दिसल्यास सदरच्या जमीन मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्वतः दिल्याचे सांगितले व तहसीलदार यांनी याबाबत लेखी हमी व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तहसीलदार यांचे लेखी पत्र व सद्यस्थितीत होणारी अतिवृष्टी पाहता मनसेचे घंटाण्यात आंदोलन तात्पुरते स्थगित करून भविष्यात जर अनधिकृत वाळू उपसा सुरू राहिल्यास स्थगित केलेले आंदोलन येथे गणेश चतुर्थी नंतर पुन्हा करण्याचे लेखी निवेदन उप तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांनी प्रांताधिकारी कुडाळ यांना दिले आहे.