दादर: तळगाव गुणगौरव समिती, तळगाव ता. मालवण जिल्हा. सिंधुदुर्ग यांच्या वतीने २०२० पासून समाजासाठी सेवाभावी वृत्तीने शिक्षण,रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास, कलाकौशल्य अश्या विविध सामाजिक कार्यात बहुमूल्य योगदान देणार्या तळगाव मधील कार्यशील व्यक्तिंना प्रतिवर्ष तळगाव भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
सन.२०२४ या वर्षीसाठीचा पाचवा तळगावभूषण* पुरस्कार गावातील मुंबईस्थित समाजसेवक श्री.गोपाळ सीता रघुनाथ दळवी यांना प्रदान करण्यात आला. श्री.गोपाळ दळवी यांनी महाराष्ट्र शासनाच्या सचिवालयात अप्पर सचिव विधानभवन या पदावरून २०१३ साली स्वेच्छ स्वेच्छानिवृत्ती घेतली असून सध्या ते भाजपा विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे कार्यालय प्रमुख म्हणून कार्यरत आहेत तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या विधी व आचारसंहिता कक्षाचे सह-संयोजक म्हणून कार्यरत आहेत याखेरीज ते मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त म्हणूनही कार्यरत आहेत व हा त्यांचा दुसरा कार्यकाल आहे.
नोकरी व समाजकार्य अश्या विविध पदावर कार्यरत असताना त्यांनी आपल्या पदाचा सदुपयोग आपल्या गावातील विविध विकास कामांसाठी केला आहे. त्यांनी आमदार व खासदार निधीचा वापर तळगाव मध्ये मुख्य रस्ता, वाडीतील अंतर्गत रस्ते, वाड्या जोडणारा पूल, मंदिर जीर्णोद्धार, आरोग्य केंद्र दुरुस्ती, स्ट्रीट लाइट अश्या विविध विकासाच्या कामांसाठी करून गावाच्या विकासा मध्ये महत्पूर्ण योगदान दिलेले आहे तसेच श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासा च्या मदत केंद्रा अंतर्गत कित्येक गरजवंत रूग्णांना उपचारासाठी मदत केली आहे.
त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणुन सन २०२४ या वर्षीचा तळगाव भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी श्री सिद्धिविनायक मंदिर सभागृहात त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय, मित्रपरिवार, कार्यालयीन सहकारी व तळगाववासीय यांच्या उपस्थितीत तळगाव गुणगौरव समिती तर्फे डॉ.रेखाजी भातखंडे व प्रो.डॉ विठ्ठलजी सोनटक्के यांचा हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यातआला. याप्रसंगी उपस्थितांपैकी त्यांच्या हितचिंतकांनी तसेच गावातील व्यक्तीनी देखील वीडियो व पत्राद्वारे आपले मनोगत व्यक्त केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.त्यांचे सुपुत्र कु.सिद्धेश याने आपले सुपरहीरो असलेल्या आपल्या वडिलांबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना संपूर्ण सभागृह भावुक झाले.
आपण केलेली कामे ही आपले तळगाव व ग्रामस्थ यांच्या प्रेमापोटी व श्री सिद्धिविनायक, ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांच्या कृपा आशीर्वादाने केलेली असून भविष्यात अजुनही विकासाची खूप कार्य करण्याचा मानस असल्याचे त्यांनी पुरस्कार प्रदान कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना केले.
तळगाव गुणगौरव समिती
श्री. सुभाष मातवनकर कार्याध्यक्ष
श्री. अमोल दळवी कार्यवाहक
श्री. नितीन सावंत: कार्यवाहक
श्री. सुनील दळवी: कार्यवाहक













