बिना परवाना बंदूक बनवणे प्रकरणी कृष्णा धुरी याला पोलिस कोठडी

मुंबई येथून एकाला घेतले ताब्यात

कुडाळ : विनापरवाना बंदुका बनवण्याचे साहित्य ताब्यात बाळगल्याप्रकरणी माणगाव येथील कृष्णा धुरी यांना कुडाळ पोलिसांनी अटक केली. तसेच पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना झाले असून यामध्ये सुद्धा मुंबईवरून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईवरून ताब्यात घेण्यात आलेला इसम अजून काय माहिती देतो आणि किती आरोपी निष्पन्न होतील याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान या प्रकरणातील शांताराम पांचाळ आप्पा उर्फ परेश धुरी व कृष्णा धुरी यांना न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर या प्रकरणातील अन्य तिघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

माणगाव खोऱ्यातील मोरे मधली वाडी येथे शांताराम पांचाळ आप्पा धुरी हे बंदुका बनवत असल्याची बातमी पोलिसांना समजले त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता बंदुका बनवण्याचे साहित्य तसेच वन्य प्राण्यांचे साहित्य सापडून आले याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करत असताना बंदुका बनवण्यासाठी साहित्य पुरवणारे तसेच बंदुका खरेदी करणारे यांची माहिती पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या शांताराम पांचाळ व आप्पा धुरी यांनी दिली त्यानंतर याप्रकरणी कोल्हापूर आजरा येथील यशवंत राजाराम देसाई, प्रकाश राजाराम गुरव, मालवण नांदरूख येथील सागर लक्ष्मण घाडी यांना ताब्यात घेण्यात आले होते आता कृष्णा धुरी यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. त्यांच्यासहित शांताराम पांचाळ, आप्पा धुरी, यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर यशवंत देसाई, प्रकाश गुरव, सागर घाडी यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आले दरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे मुंबई पर्यंत असल्यामुळे पोलिसांचे एक पथक मुंबई येथे रवाना करण्यात आले त्या पथकाच्या हाती एक इसम लागला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

error: Content is protected !!