राठीवडे ग्राम पंचायत उपसरपंच पदी निखिल नारायण जाधव यांची बिनविरोध निवड.

संतोष हिवाळेकर / पोईप

मालवण तालुक्यातील ग्राम पंचायत राठीवडे उपसरपंच पदी निखिल नारायण जाधव यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन उपसरपंच स्वप्निल पुजारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर निवड करण्यात आली आहे. स्वप्निल पुजारे यांनी आपली अडीच वर्षांची कारकीर्द यशस्वी करुन राठीवडे नावासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तोच आदर्श निखिल जाधव यांनी डोळ्यासमोर ठेवून व सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे अशा भावना उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी व्यक्त केल्या. या उपसरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी विनोद रावले यांनी कामकाज पाहिले. या वेळी सरपंच दिव्या धुरी, स्वप्निल पुजारे, बाळा धुरी, मनस्वी मेस्त्री,काजल धुरी, ज्येष्ठ समाजसेवक सुभाष धुरी, नारायण जाधव,कीशोर पाताडे, गंगाराम धुरी, दिक्षा जाधव, आत्माराम धुरी,रसिका कदम, प्रीतम जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. निखिल जाधव यांची उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर सरपंच सौ. दिव्या धुरी यांनी यानी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर उपस्थित मान्यवरांनी सुध्दा उपसरपंच निखिल जाधव यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.


उपसरपंच पदी निवड झालेल्या निखिल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपण सर्वांनी माझ्याकडे दिलेली जबाबदारी मी प्रामाणिक पणे पार पाडून माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थकी लावीन तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या भावनांचा व सुचनांचा आदर राखून सदैव काम करीन त्या साठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करीत सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!