सोशल मीडियाच्या मोहात पडू नका!

माजी मुख्याध्यापक श्री अशोक येजरे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये कै. अच्युत रघुनाथ प्रभुतेंडोलकर स्मरणार्थ बक्षिस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न

कुडाळ : विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी श्री प्रभू तेंडोलकर कुटुंबीयांमार्फत अव्याहत चालू असलेल्या या बक्षीस योजनेमार्फत मिळालेली कौतुकाची थाप हा पांडुरंगाच्या वारीतील प्रसाद समजून पुढील वाटचाल करा असा मौलिक कानमंत्र विद्यार्थ्यांना श्री अशोक येजरे यांनी शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये आयोजित कै. अच्युत रघुनाथ प्रभुतेंडोलकर स्मरणार्थ बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या योजनेचे दाते व झाराप येथील प्रतिथयश उद्योजक दिलीप प्रभुतेंडोलकर संस्थेचे अध्यक्ष श्री मुकुंद धुरी, संस्था सचिव श्री प्रदीप प्रभुतेंडोलकर , संस्था उपाध्यक्ष श्री भास्कर परब, संस्था संचालक श्री सतीश साळगावकर, श्री ज्ञानदेव चव्हाण, माजी विद्यार्थी तथा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री सद्गुरु डिचोलकर, मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार, कॉलेजचे प्राचार्य श्री सचिन पाटकर श्री हंसराज सावंत पालक श्री सावळाराम माणगावकर, श्री रोशन प्रभू श्री कोलार, सौ. अनिता हळदणकर, सौ. सानिका हळदणकर तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री अशोक येजरे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत विविध दाखले देत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली असून ही बक्षीस योजना आपल्याला जगण्याचे सामर्थ्य देईल यात शंका नाही श्री प्रभू तेंडुलकर कुटुंबियामार्फत चालवि लेली बक्षीस योजना जिल्ह्यातील एक नाविन्यपूर्ण योजना असून आपण या योजनेचा चांगल्या पद्धतीने लाभ घ्या श्री दिलीप प्रभू तेंडोलकर यांचा या वयातही उत्साह वाखाण्याजोगा आहे आपण अशा यशस्वी लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनातील उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करा आज विज्ञानाच्या युगात वावरत असताना आपल्याला सोशल मीडियाची मोठ्या प्रमाणात भुरळ पडलेली दिसून येते त्याच्या आहारी न जाता पालकांशी सुसंवाद साधा व समाजामध्ये आपलं व आपल्या पालकांचं नाव मोठं होईल असं काम करा असे विद्यार्थ्यांना सांगितले विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक छोटी मोठे दाखले देत विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्व समजावून सांगितले. यावेळी संस्था सचिव श्री प्रदीप प्रभूतेंडोलकर यांनी आजच युग हे स्पर्धेचं युग आहे स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल हा संघर्ष करत असताना दिलीप काकांसारख्या संघर्षशील व्यक्तीचा संघर्ष आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे व समाजामध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले पाहिजे आपल्याला मोठं करण्यामध्ये ज्या -ज्या लोकांचं योगदान असेल त्या सर्वांना नेहमीच स्मरणात ठेवा असे विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनामधून उस्फुर्तपणे कुमारी निधी एकनाथ कुमारी सृष्टी नारायण सावंत, कुमारी दुर्वा निलेश धुरी यांनी या योजनेचे भरभरून कौतुक करत विद्यार्थ्यांनमध्ये खऱ्या अर्थाने या योजनेमुळे सकारात्मक स्पर्धा वाढून विद्यालयाचा निकाल वाढीस चालना मिळाल्याचे सांगितले. शैक्षणिक वर्ष 24 -25 मध्ये इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी केला तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री एकनाथ कांबळे यांनी व बक्षिसाचे वाचन सहाय्यक शिक्षक श्री काशिनाथ बागेवाडी यांनी तर आभार सहाय्यक शिक्षक विद्यानंद पिळणकर यांनी मानले.

error: Content is protected !!