राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठी दोन्ही जिल्हाध्यक्षांकडून जनतेच्या डोळ्यात धुळफेक


सरकारच्या माध्यमातून वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकरिता झालेल्या कामांची माहिती जाहीर करावी – कुणाल किनळेकर.

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सत्ताधारी पक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष व शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यामध्ये पत्रकार परिषदा घेऊन भांडण्याचे नाटक जोरात सुरू आहे. तसं पाहता याला दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आपल्या सरकारच अपयश झाकण्यासाठीच जनतेच्या डोळ्यात होणारी धुळफेकच म्हणावी लागेल. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी व आता अधिवेशन संपले असता सिंधुदुर्ग जिल्ह्याला या अधिवेशनांमधून नेमकी उपलब्धी काय झाली हे सत्ताधारी पक्षाकडून सिंधुदुर्ग वासियांना सांगणं अपेक्षित असतं. सद्यस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या समस्या, युवकांच्या वाढत्या आत्महत्या शेतमालाला हमीभाव, मुंबई गोवा महामार्ग तसेच जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरावस्था यावर सत्ताधाऱ्यांकडून काहीच बोलणं होताना दिसत नाही.
एकीकडे निधीच्या अभावामुळे रखडलेली विकास कामे यामुळे सिंधुदुर्गच्या जनतेचा रोष असल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी हे आपापसात भांडून जनतेच्या डोळ्यात धुळफेकच करत आहेत असा आरोप मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे.

error: Content is protected !!