सिं. जि. चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग शाखा कुडाळच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळ्याचे आयोजन

कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग तालुका शाखा कुडाळच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे या वर्षी देखील विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व अन्य सन्मानित समाज बांधव यांचा सत्कार समारंभ तालुका शाखा कुडाळचे अध्यक्ष श्री. संतोष जगन्नाथ चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. मराठा समाज हॉल कुडाळ (कुडाळ हायस्कूल नजीक) येथे आयोजित केला आहे.या सोहळ्यात कुडाळ तालुका चर्मकार समाजातील सन-२०२५ मध्ये स्कॉलरशीप, नवोदय परीक्षा उत्तीर्ण-प्रवेश, इ.१०वी, १२वी, पदवी, पदवीका, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गौरव करण्यात येणार आहे. तरी त्यांनी आपल्या गुणपत्रिकाच्या झेरॉक्स प्रती प्रत्यक्ष किंवा व्हॉटसप वर श्री. रामदास चव्हाण कुडाळ पंचायत समिती बाजुस (९८२३१४१३६९) व श्री. नरेंद्रकुमार चव्हाण (९४०३८५१८७७) या नंबर वर पाटवून नावाची नोंदणी दिनांक २८ जुलै २०२५ रोजी पर्यंत करावी अशी विनंती आयोजकांनी केली आहे. तसेच सेवानिवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी, उल्लेखनिय कामगिरी केलेले व विविध समित्या/संस्थावर निवड झालेल्या समाज बांधव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. आयोजकांनी या सत्कार सोहळ्यास सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी वेळीच उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!