बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर धारगळ-पेडणे गोवा येथे आज दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात कोल्हापूर-पणजी एसटी बसखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुदीप पैकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज दुपारी घडला. कोल्हापूरहून पणजीकडे जाणाऱ्या एसटी बसखाली दुचाकीस्वार सुदीप पैकर चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तत्काळ पेडणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलीस अधिक तपास करत आहेत.