कुडाळ : झाराप – साळगाव – माणगाव रस्त्यावर मोठ – मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. पावसाचे पाणी खड्ड्यात साचून खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची देखील शक्यता होती. याबाबत सिंधुदर्पण न्युज चॅनेलच्या माध्यमातून काल वृत्त प्रसारित करण्यात आले होते. हे वृत्त प्रसारित होताच प्रशासनाला जाग आली असून २४ तासांच्या आत खड्डे बुजवण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.