विजेच्या विविध समस्यांबाबत लक्ष वेधत उपअभियंता श्री. कांबळे यांना विचारला जाब
गेले अनेक कित्येक दिवस कट्टा व आजुबाजूच्या भागात स्मार्ट मीटरचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे आज कट्टा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कट्टा वीज वितरण महामंडळाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो, गंभीर घटना घडल्यास अधिकारी उपलब्ध नसतात,नेहमी विजेचा लपंडाव सुरू असतो, फॉल्टी मीटरच्या नावाखाली स्मार्ट मीटर बसविले जात आहेत आणि वीज बिल तिनपटीने आकारले जाते. कोणत्याही ग्राहकांना पूर्वकल्पना सूचना न देता जुने मीटर काढून त्यावर नवीन स्मार्ट मीटर बदलले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. नवीन स्मार्ट मीटरमुळे वीज बिल जास्त येत असून ग्राहकांची लूट केली जात आहे त्याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यापुढील काळात फॉल्टी मीटरच्या नावाखाली स्मार्ट मीटर बदलले गेले तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्याचबरोबर जास्तीचे डिपॉझिट घेत असल्याचे निदर्शनास आणून दिले. असा भोंगळ कारभार पुन्हा घडल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. तसेच कोणत्याही ग्राहकाची तक्रार नसताना अदानी कंपनीचे कर्मचारी येऊन मीटर बदलून जातात यावरून अधिक आक्रमक होत मीटर बदलताना आढळल्यास चोप देण्यात येईल असे सांगण्यात आले.
गणेश चतुर्थी सण जवळ येत असून स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिल आलेल्या गरीब कुटुंबातील व्यक्तींनी करायचे काय असा प्रश्न विचारत आक्रमक पवित्रा घेत जो कोणी अदानी कंपनीचा कर्मचारी हे मीटर बदलत आहे त्याला तात्काळ बोलवून घेण्याची मागणी लावून धरत प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी उपअभियंता श्री. कांबळे यांनी आपल्या मागणीनुसार सर्व काही समस्या असतील त्या सोडवल्या जातील असे सांगितले. वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून स्मार्ट मीटरचा प्रश्न आहेत तो प्राधान्याने सोडवण्यात येईल असे सांगितले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, पेंडुर विभागप्रमुख शिवा भोजने, युवासेना विभागप्रमुख वंदेश ढोलम, ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर, शाखाप्रमुख पेंडुर निलेश हडकर, रमेश फाटक, अभय वाईरकर, गणेश वाईरकर, दीपक गुराम, राहुल मालवदे, बाळकृष्ण मसुरकर, देवा रेवडेकर, शेखर रेवडेकर, जगदीश मोरजकर आदी उपस्थित होते.
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104


Subscribe










