पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे दुकानामध्ये चोरी

हजारो रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला

पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे असलेल्या संजना कलेक्शन कपडे विक्रीच्या दुकानाच्या छपराचे पत्रे तोडून या दुकानांमध्ये प्रवेश करून त्यामधील दुकानातील सुमारे ३७ हजार रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत आरती संजय परब यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

पिंगुळी देऊळवाडी येथील आरती परब यांचे म्हापसेकर तिठा येथे संजना कलेक्शन नावाचे कपडे विक्रीचे दुकान आहे या दुकानांमध्ये अज्ञात चोरट्याने छपराचे सिमेंटचे पत्रे तोडून त्या दुकानांमध्ये प्रवेश करून दुकानांमधील ब्युटी पार्लर मधील विविध प्रकारचे साहित्य चोरले सुमारे ३७ हजार रुपये किमतीचे हे साहित्य चोरीला गेल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. कुडाळ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

error: Content is protected !!