पिंगुळी स्थित ग्लोबल फाउंडेशन ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालये यामध्ये संगणक प्रशिक्षणाचे आयोजन करते. ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणक शिक्षणामध्ये वंचित राहता कामा नये या सहहेतूक दृष्टीने संगणक शिक्षणाचा प्रसार व्हावा हे ग्लोबल फाउंडेशनचे ध्येय आहे. केरवडे तर्फ माणगाव या प्रशालेमध्ये दि.२१/०७/२०२५ पासून संगणक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी ग्लोबलचे व्यवस्थापक श्री परब सर सरपंच सौ.श्रिया ठाकूर, शालेय व्यवस्थापनच्या उपाध्यक्षा मल्हार मॅडम, स्थानिक ग्रामस्थ व सेवानिवृत्त शिक्षक व्ही के परब, प्रशिक्षक स्वप्निल नाईक, शालेय मुख्याध्यापक गवस सर ग्लोबल चे सहाय्यक श्री उमेश गावडे सर व श्री प्रथमेश परब व अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश गावडे सर यांनी केले. प्रथम दीप प्रज्वलन होऊन पाहुण्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन व सरस्वती मातेच्या फोटोला पुष्पहार घालून झाले. ग्लोबलचे व्यवस्थापक श्री प्रसाद सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली. प्रशिक्षणाचा लाभ ३२ विद्यार्थी घेणार आहेत. प्रशिक्षण कालावधी १० दिवसाचा असून या कालावधीमध्ये संगणकाची सराव सत्र व हाताळणे इत्यादींचे तपशील वार ज्ञान श्री स्वप्निल नाईक सर यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण संगणकीय तंत्रज्ञान शिकण्यासाठी मुले खूप उत्सुक आहेत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सावंत सर यांनी केले.

केरवडे तर्फ माणगाव या प्रशालेमध्ये ग्लोबल च्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण….
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










