मालवण : तालुक्यातील कोळंब या गावात तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. नितीन मुकुंद कोचरेकर असे त्याचे नाव आहे. यावेळी तो ४३ वर्षांचा होता. मालवण पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन कोचरेकर याच्या तोंडात फोड आले होते. त्यामुळे आपल्याला कर्करोग झाला आहे असे त्याला वाटले. याची भीती वाटून नायलॉन दोरीने घराच्या पडवीतील वाशाला गळफास घेत त्याने आत्महत्या केली.