वेताळ बांबर्डे येथे घराला आग लागून नुकसान

कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथे घराला आग लागून नुकसान झाले आहे. वेताळ बांबर्डे येथील प्रमोद बांबर्डेकर यांच्या घराला ही आग लागली असून या आगीत बांबर्डेकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिस पंचनामा करत होते.

error: Content is protected !!