दरवर्षीप्रमाणे मालवण शहरातील धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येत असून आज माजी आमदार वैभव नाईक यांनी श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने वसंत गावकर यांच्या हस्ते वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नंदू गवंडी, उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, मनोज मोंडकर, नरेश हुले, बंड्या सरमळकर, उमेश चव्हाण, श्री.लाड, भगवान लुडबे, सिद्धेश मांजरेकर, तेजस लुडबे, शिवाजी केळुसकर, गणपत आडिवरेकर, गणपत सावबा आदी उपस्थित होते.