अखेर कणकवली विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून संदेश पारकर यांना “एबी” फॉर्म

आमदार नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर अशी होणार लढत

सुशांत नाईक, अतुल रावराणे यांची नावे होती इच्छुकांच्या यादीत

अखेर अनेक दिवसांच्या चर्चा आणि प्रतीक्षेनंतर कणकवली विधानसभेसाठी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात लढण्याकरता शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे नाव जाहीर करत त्यांना “एबी” फॉर्म देण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आता संदेश पारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून संदेश पारकर हे आमदार नितेश राणेंशी लढत देणार आहेत. संदेश पारकर हे कणकवली चे सरपंच, नगराध्यक्ष राहिले असून यापूर्वी देखील त्यांनी एकदा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा संदेश पारकर नव्या ताकतीने रणेंशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले असून गेले काही दिवस या उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गटामध्ये धुसफूस दिसत होती. युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अतुल रावराने व संदेश पारकर यांच्यामध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा असताना अखेर संदेश पारकर यांनी या स्पर्धेमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे आता संदेश पारकर यांना येत्या अवघ्या काही दिवसांमध्ये मोर्चे बांधणी करून विधानसभेच्या रणधुमाळी आपली प्रतिष्ठा पनाला लावावी लागणार आहे. आज गुरुवारी रात्री मातोश्री वरून संदेश पारकर यांच्या हाती एबी फॉर्म सोपविण्यात आला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार मिलिंद नार्वेकर माजी खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *