संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई – अदिती तटकरे
ब्युरो न्यूज: अक्कलकुवा तालुक्यातील नेवासा अंकुश विहीर येथील बाबावाडी अंगणवाडी केंद्रावर मयत असलेल्या मदतनीस महिलेच्या नावावर अन्य महिलेने काम करून शासनाची फसवणूक केल्याचा मुद्दा आमश्या पाडवी यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याप्रकरणी दोषी आढळणाऱ्या बाळ विकासप्रकल्प अधिकारी आणि उपमुख्याधिकारी याना निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.