गोव्यात आपली भाभी आल्याचे खोटे सांगितले
वैभववाडी : इंदोर येथून आरामबसने गोव्याकडे निघालेल्या उत्तरप्रदेश येथील घरातून निघून गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला वैभववाडी पोलीसांनी करूळ तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले. सध्या तिला सावंतवाडी येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
इंदोरवरून गोव्याकडेन निघालेली आरामबस (क्रमांक एआर, बी २०२३) आज (ता.७) दहा वाजण्याच्या सुमारास करूळ तपासणी नाक्यावर आली. यावेळी आराम बसचालक संजय राठोड (रा. इंदोर) यांनी आपल्या बसमध्ये एक संशयित अल्पवयीन मुलगी इंदोरपासुन प्रवास करीत असल्याचे पोलीसांनी सांगीतले. पोलीस कॉन्स्टेंबल सुरज पाटील, पोलीस नाईक उध्दव साबळे यांनी त्या बालिकेकडे विचारणा केली. परंतु काहीही बोलत नव्हती. त्यामुळे तिला वैभववाडी पोलीस स्थानकात आणण्यात आले. तेथे महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी केली असता तिने आपले नाव व पत्ता (रा. ग्रामपोस्ट बेताहानीय, करूहिया, बलरामपुर, उत्तरप्रदेश) असे सांगितला. तसेच आपली भाभी गोवा येथे राहते. आपण तिच्याकडे जात असल्याचे सांगीतले. त्यानतंर पोलीसांनी गोव्यातील त्या महिलेशी संपर्क साधला असता तिने ही मुलगी आपली कुणीही नातेवाईक नसल्याचे सांगीतले. त्यानतंर पोलीसांनी संबंधित मुलीच्या घरी उत्तरप्रदेशला सपंर्क साधला. वडील रामबहादुर देवी यांनी आपली मुलगी घरात काहीही न सांगता निघून गेली आहे. तिला घेवुन जाण्यासाठी आपण येत आहोत असे सांगितले. सध्या त्या मुलीला सावंतवाडी येथील सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे.


Subscribe









