सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली या गावात एका महिलेवर बैलाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली आहे. अनिता अरुण रेडीज (४८) असं त्या महिलेचे नाव आहे. त्यांनी बैलांना चरण्यासाठी सोडले असता एका बैलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.