तुळशीच्या पानावर रंगाने साकारली विठुरायाची सुंदर मूर्ती…

तेर्सेबांबर्डे गावातील इयत्ता दहावी मध्ये शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव येथे शिकणाऱ्या निखिल वासुदेव मेस्त्री या विध्यार्थाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुळशीच्या पानावर रंगाने फारच सुबक, सुंदर अशी विठुरायाची मूर्ती साकारून सर्वांना आगळ्या वेगळ्या भक्तीमय अश्या शुभेच्छा दिल्या.

निखिल याने आपल्यातील कलेला वाव देत अत्यंत कल्पकतेने साकारलेल्या कलाकृतीचे तसेच या कलाकृतीच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे निखिल याला या त्याच्या कलाकृती करिता वडील श्री वासुदेव मेस्त्री यांचे मार्गदर्शन लाभले.

निखिल याचे त्यानी दाखविलेल्या आपल्या कलेबद्धल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खुपसाऱ्या शुभेच्छा…..रामकृष्ण हरी… जय हरी विठ्ठल…. 🙏

error: Content is protected !!