केंद्रीय सहकारीता मंत्रालय स्थापना वर्धापन दिनानिमित्त ‘सहकार रांगोळी स्पर्धा’

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सिंधुदुर्ग व आवळेगाव हायस्कूल यांचे आयोजन

कुडाळ : गुरुवार दिनांक 3 जुलै 2025 रोजी आवळेगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे केंद्रीय सहकारीता मंत्रालय स्थापना वर्धापन दिनानिमित्त जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सिंधुदुर्ग व आवळेगाव हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘सहकार रांगोळी स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी सहाय्यक उपनिबंधक श्री. सुनील मरभळ यांनी विद्यार्थ्यांना सहकार क्षेत्रातील रोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!