कणकवली : शुक्रवार दिनांक ४ जुलै २०२५ रोजी केंद्रीय सहकारीता मंत्रालय स्थापना वर्धापन दिनानिमित्त कणकवली कॉलेज कणकवली येथे सहकार रांगोळी स्पर्धा कणकवली कॉलेज कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक निबंधक श्री सुनील मरभळ यांनी विद्यार्थ्यांना सहकार क्षेत्रातील संधी यांच्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.