बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ या शाळेतील 200 गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्याना प्रत्येकी दिड डझन वहीचे वितरण

उद्योजक अनिलजी कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने कुडाळ शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून सहकार्य

सिंधुदुर्ग : बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ या शाळेचे शाळा समितीचे उपाध्यक्ष श्री.अनिलजी कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने 200 गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्याना प्रत्येकी दिड डझन वही ( 18 नग )वितरण करण्यात आले.

श्री. अनिल कुलकर्णी यांनी शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांविषयी काही कुडाळ शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना मदतीचे आव्हान करताच अल्पावधीत दाऩशूर व्यक्तीकडून एक लाख रूपये ( 1,00,000/- ) किमतीचे शैक्षणिक साहित्य मदत स्वरूपात मिळाली व मिळालेल्या मदतीतून आज रोजी विद्यालयाच्या सभाग्रहात अनिलजी कुलकर्णी त्यांच्या सुविध्यपत्नी यांच्या शुभहस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अशा सर्व दानशूर व्यक्तीचे विद्यालय सदैव आभारी आहे. कुडाळ शहरातील बॅ.नाथ पै विद्यालय हे दर्जेदार शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते यामुळे अशा अनेक दानशूर व्यक्तीकडून विद्यालयाला वेळोवेळी मदत होईल अशी अपेशा व्यक्त करण्यात आली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम. शांती पावसकर यांनी केले. तर आभार श्रीम. नूतन पिंगुळकर यांनी मानले.

error: Content is protected !!