सावंतवाडी : प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सावंतवाडी प्रांत आणि तहसीदार यांच्याकडून आकसापोटी केलेल्या कारवाई विरोधात आंबोलीचे तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी सुमित घाडीगावकर यांनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी अनिल पाटील, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे सुपूर्त केले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, सावंतवाडी प्रांत व तहसीलदार यांच्याकडून माझ्यावर आकसापोटी कारवाई करण्यात आली असून माझे माहे एप्रिल २०२५ पासूनचे वेतन गोठवण्यात आले आहे. त्यामुळे माझ्यावर व माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सावंतवाडी तहसीलदार व प्रांत यांच्या या कारवाईविरोधात मी १० जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणास बसणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.